पुणे

खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम लवकरच

सुधीर साबळे

पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान आदी प्रकारच्या सुविधा विकसित करण्याचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले असून, आगामी दोन महिन्यांत या कामाला सुरवात होणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा मास्टर प्लॅन युनायटेड किंगडममधील एसजीएस कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. २४० एकर जागेत हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्यात खुल्या प्रदर्शन केंद्राबरोबरच तीन मोठे प्रदर्शनाचे इनडोअर हॉल आणि व्यावसायिकांसाठी जागेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा विकास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. सुरवातीच्या काळात बांधण्यात येणारे खुले प्रदर्शन केंद्र २० हेक्‍टर जागेत उभे राहणार आहे. त्याच्या विकासासाठी ४५ कोटी रुपये खर्च येणार आहे. याठिकाणी अंतर्गत रस्ते, मैदान या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्‍स्पोसारखी मोठी प्रदर्शने भरविता येणार आहेत.

व्यावसायिकांसाठी तीस एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून, त्याचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी वीज, पाणी यांबरोबरच अन्य सोयी-सुविधांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

केंद्रामध्ये प्रदर्शनासाठी ३५ हजार स्क्वेअर मीटर जागेत तीन हॉल बांधण्यात येणार आहेत. हॉलच्या बांधणीसाठी प्राधिकरणाकडून वित्तीय सल्लागाराची नियुक्‍ती करण्यात येईल. खुल्या प्रदर्शन केंद्राचा विकास सुरू असताना या हॉलच्या कामाला सुरवात होईल. संपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या विकासासाठी दीड हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांपूर्वी एका जर्मन कंपनीला पुणे परिसरात त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवायचे होते. मात्र, त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध न झाल्याने त्यांनी हे प्रदर्शन मुंबईमध्ये भरविले होते. 

मोशीत खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाइलबरोबरच अन्य क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना ते सहज शक्‍य होणार असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे माजी महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात खुल्या प्रदर्शन केंद्राच्या विकासाला सुरवात होणार आहे. उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी कंपन्यांना याठिकाणी हक्‍काची जागा उपलब्ध होणार आहे. 
- सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT