an opportunity to eat on veg-non veg food in Pune 
पुणे

पुणेकरांनो, व्हेज-नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारण्याची संधी; पाहा कुठे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खेकडे, मटण-भाकरी, चिकन पकोडा, सुरमई, बांगडा, तळलेले मासे, बिर्याणी खेकडा असे नानाविध नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारण्याची संधी खवय्ये पुणेकरांना मिळणार आहे. तसेच पुरणमाळी, मांडे, पिठ्ठल भाकरी, भरली वांगी, कांदा- बटाटा  भजी, लोणचे-चटण्या, रानातल्या पालेभाज्या, जिलेबी, गव्हाची खीर असे जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ पुणेकारांना एकाच जागी मिळणार आहेत.

खाद्यप्रेमी पुणेकरांची पर्वणी म्हणजे भीमथडी जत्रा बुधवारी सुरु झाली आहे. या जत्रेत खाद्यापदार्थांशिवाय हस्तकलेच्या वस्तू, कपडे खरेदी करण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. तसेच, वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा यंदाच्या जत्रेचे आकर्षण असणार आहे. सिंचननगरच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारपर्यंत (ता. 22) ही जत्रा असणार आहे. 

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली "पंढरीची वारी' यंदाच्या जत्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. जत्रेत 16 जिल्ह्यांतून आलेले 350 बचत गटांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. तसेच, चोखंदळ खवय्यांसाठी 90 खाद्यपदार्थांचे स्टॉल जत्रेत आहेत. 

चोखंदळांची 'भीमथडी' 
- 14 राज्यांतील बचत गटांचा सहभाग 
- शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे 90 स्टॉल 
- हस्तकलेच्या वस्तू आणि वस्त्रांची विक्री 
- 80 टक्के महिलांचा सहभाग 
- "आम्ही पुणेकर' हे महिलांसाठीचे विशेष दालन 
- सेंद्रिय पदार्थांसह गावरान धान्याचे स्टॉल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT