Pune Ganeshotsav 2023 Esakal
पुणे

Pune Ganeshotsav 2023: श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण, ३५ हजार महिलांच्या हाती 'सकाळ'

सकाळ वृत्तपत्र हातात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात गणपतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज 35 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं आहे. यावेळी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळ वृत्तपत्र हातात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे पठण केले.(Latest Marathi News)

ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 35 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.(Latest Marathi News)

महिलांनी 'सकाळ' वृत्तपत्राचा वापर अथर्वशीर्ष पठणासाठी केला. जमलेल्या महिलांच्या हातामध्ये सकाळ वृत्तपत्र यावेळी दिसून आले. गेल्या ३५ वर्षांपासून सामूहिक अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनेक महिला गेले कित्येक वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणसाठी हजेरी लावतात.

महिलांनी पहाटेपासून गणरायाच्या नामाचा जयघोष सुरू केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न झाल्याचे दिसून आले. गेल्या ३५ वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम होतो आहे. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे. पारंपारिक वेशात हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.(Latest Marathi News)

अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमाला रशियन नागरिकांच्या एका गटाला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 35 हजार महिलांचा यामध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT