nitin gadkari sakal
पुणे

पालखी महामार्गासह प्रलंबित कामे गतीने मार्गी लावावीत; नितीन गडकरी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी महामार्गांचे भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात यावे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी महामार्गांचे (Palkhi Marg) भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात यावे. तसेच, पुणे विभागात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे गतीने मार्गी लावावीत, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी दिले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गुरुवारी (ता. २६) पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्प यासह पुणे विभागातील रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही महामार्गासाठी सुमारे ११ हजार ६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गडकरी यांनी दोन्ही पालखी मार्गाचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पुण्यात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करावी. तसेच, चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामे करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांविरुध्द कठोर कारवाइ करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील पालखी महामार्गावरील जेजुरी, पवारवाडी, शिंदेवाडी आणि दिवे गावातील भूसंपादनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. या चार गावांमधील भूसंपादन पूर्ण झालेले नाही. जेजुरी गावातून हा महामार्ग न्यायचा, की बाह्यवळण मार्ग करायचा, याबाबत निर्णयास विलंब झाला. त्यामुळे भूसंपादनास विलंब झाल्याची बाब प्रशासनाकडून गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही विभागातील प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हडपसरपासून सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वाखरी, पंढरपूर या गावांच्या हद्दीतून जातो. तर, संत तुकाराम महाराज महामार्ग जिल्ह्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा मार्ग बारामती, निमगाव केतकी, इंदापूर, अकलूज, वाखरी या गावांमधून जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्हांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT