पुणे

कोल्हापूर:पाणंद रस्त्यात अडथळा आणल्यास कारवाई

CD

पाणंद रस्त्यात अडथळा केल्यास कडक कारवाई
--
‘महाराजस्व’ समाधान शिबिरात प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांचा इशारा
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
कसबा बीड, जि. कोल्हापूर : पाणंद रस्त्यांमध्ये अडथळा निर्माण करून शेतकरी व नागरिकांच्या हक्काच्या मार्गात अडसर आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी दिला.

कसबा बीड येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

पाणंद रस्ते हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती व्यवहाराशी निगडित जिव्हाळ्याचा विषय असून, कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवरील महसुली व शेतीसंबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात तहसीलदार स्वप्नील पवार, भूमी अभिलेख अधीक्षक किरण माने आणि तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या विविध विभागांनी नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेत तत्काळ निवारणाचा प्रयत्न केला.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य लता दिघे, मेघा नाळे, निवास पाटील, आनंद कांबळे, शिरोली दुमाला येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, कृषी संचालक उत्तम वसरे, दादासो लाड, किशोर पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी पत्रकारांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? भारतावर विश्वास का ठेवावा? पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी दिले सडेतोड उत्तर

Everest Base Camp Trek: २१० किलोमीटरचा खडतर हिमालयीन प्रवास; आळंदी-पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांचा साहसी पराक्रम, १६ दिवसांचा थरारक प्रवास पूर्ण..

Ajit Pawar NCP: महाराष्ट्रात नवा ‘राजकीय चाणक्य’ सक्रिय! अजित पवारांच्या पक्षात मोठे बदल, प्रशांत किशोर यांची पुण्यात एंट्री

Mumbai News: वांद्र्यात रेल्वेचा बुलडोझर! गरीबनगरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई; परिसरात तणावाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT