car crime sakal
पुणे

Patas Crime : खंडणीच्या आरोपाखाली दोन पत्रकारांना अटक; पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर गुरुवारी दुपारी चार वाजता घडला थरार.

सकाळ वृत्तसेवा

पाटस (ता. दौंड) - पुणे सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) हद्दीत पुणे खंडणी विरोधी पथकाच्या अंगावर गाडी घालून पळून जाणाऱ्या दोन जणांना अटक केली. खंडणी विरोधी पथकाने संबधीत आरोपींच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केल्यानंतर ती गाडी थांबली गेल्याची माहिती समोर येत आहे. दोन जण हे कथित पत्रकार असून त्यांनी पुणे येथे खंडणी मागितल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते.

पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर गुरुवारी दुपारी चार वाजता हा थरार घडला आहे. संबधीत आरोपींनी पुणे येथे खडणी मगितल्याची तक्रार होती. त्यानुसार पुणे खंडणी विरोधी पथक त्यांच्या मागावर होते. आज दुपारी दोघांचे पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड येथे लोकेशन मिळत होते. त्यानुसार पथकाने पाठलाग केला. पथकाने पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर सापळा लावला.

आरोपी चार चाकीने सोलापूर दिशेला जात असताना खंडणी विरोधी पथकाने त्यांना अडविले. मात्र त्यांनी पथकाच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचे धाडस केले. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केला.यावेळी टायर फुटल्याने गाडी थांबताच पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.

संबधित आरोपी हे पत्रकार असल्याचे समोर येत आहे.शिवाय त्यांच्या गाडीच्या काचेवर तसे नाव लिहिले आहे. संबंधित आरोपींनी पूणे येथे एकास अंदाजे पाच कोटींची खंडणी मगितल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाटस पोलीस चौकीत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT