Vasant More Pune VBA Esakal
पुणे

Vasant More: ससूनमध्ये उंदीर चावल्यानं झाला होता रुग्णाचा मृत्यू, वसंत मोरेंनी डीनला दिला पिंजरा भेट

वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. | Patient died due to rat bite in Sassoon hospital pune Vanchit Bahujan Aghadi candidate Vasant More gifted cage to dean

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये आयसीयूतील एका रुग्णाला उंदरानं चावा घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर ससून रुग्णालय प्रशासनाला अशा घटनांप्रती गांभीर्यानं पावलं उचलावीत यासाठी पुण्यातील वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी अनोखी शक्कल लढवत थेट ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे. (Patient died due to rat bite in Sassoon hospital pune Vanchit Bahujan Aghadi candidate Vasant More gifted cage to dean)

या भेटीबाबत मोरे यांनी सोशल मीडियावरुन यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून बातमी आली अपघातानं जखमी झालेल्या तरुणाचा ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात अॅडमिट असताना उंदरानं चावा घेतल्यामुळं मृत्यू झाला. (Latest Marathi News)

म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे आम्ही भेट दिले. जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं देण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, सागर रणुसे असं ससूनमध्ये उंदीर चावल्यानं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. १५ तारखेला दुचाकी चालवत असताना सागरचा अपघात झाला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरूच होते.

दरम्यान, २५ तारखेला त्याच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सागरला आयसीयूत दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती ढासळत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. पण सागरच्या नातेवाईकांनी आरोप केला की आयसीयूमध्ये सागरला उंदरानं विविध ठिकाणी चावा घेतला आहे, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाईकांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं ससून रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

SCROLL FOR NEXT