पुणे

मराठी भाषेत ८३ रिक्षाचालक ‘उत्तीर्ण’

CD

पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालविणाऱ्या वाहनधारकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान आहे का ? याची तपासणी गुरुवार (ता. २०) पासून सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ८३ वाहनांची तपासणी केली असून सर्व वाहन चालकांना मराठी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
परिवहन विभागाने १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये महाराष्ट्र मोटार वाहन (तिसरी दुरुस्ती नियम २०२६ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ऑटो रिक्षा/ मोटार कॅबच्या अधिकृत चालकास तसेच संबंधित वाहनाच्या परमीटधारकासही मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक केले आहे. संबंधित चालकांना/ परवानाधारकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करण्यासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली होती. मात्र, अजूनही काही चालकांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे उघड झाले असून परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवार (ता. २०) पासून वायुवेग पथकाद्वारे चालकांची तपासणी सुरू केली असून ज्या चालकांना/परमीटधारकांना मराठी भाषा येत नाही, अशा चालकांना नोटिसा देऊन मराठी भाषा शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.

तर होईल परवाना रद्द...
एक महिन्याच्या आत वाहनधारकाने मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करुन न घेतल्यास, त्याचे बॅज ३ महिन्यांच्या कालावधीपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे. या कालावधीत सुद्धा वाहनधारकाने मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करुन घेतले नाही, असे आढळून आल्यास बॅज रद्द करण्यात येणार आहे. मात्र, बॅज रद्द करण्यापूर्वी परवानाधारकास त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिली जाणार आहे.

‘आरटीओ’तही तपासणी
हजारो वाहन चालक परमीट, वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाचे पासिंग अशा विविध कामांसाठी येत असतात. या चालकांचे देखील ‘आरटीओ’त मराठी भाषेचे ज्ञान तपासले जाणार आहे. या चालकांना मराठी भाषा येत नसल्यास त्यांनाही नोटिस दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवसभरात ८३ वाहनांची तपासणी केली असून सर्व वाहन चालकांना मराठी येत होते.
- अश्‍विनी स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT