पुणे

विदेशी नागरिकावर रेल्वे पोलिसांकडून अंत्यसंस्कार

रविंद्र जगधने

पिंपरी - कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ 23 ऑक्‍टोबर रोजी आढळलेल्या एका कृष्णवर्णीय विदेशी नागरिकांची ओळख न पटल्याने सोमवारी (ता. 30) रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, त्याची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नच केले नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एका विदेशी कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पिंपरी रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात त्याचे शवविच्छेदनही केले. मृत व्यक्ती विदेशी नागरिक असल्याचे पोलिसांना माहीत असतानाही पोलिसांनी याबाबत पारपत्र (पासपोर्ट) विभाग व पुणे पोलिस आयुक्तालयाला कळवले नाही. पाच दिवस त्याचा मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पुणे रेल्वे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांना विचारले असता, त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. 

मृत व्यक्तीजवळ कोणतेही कागदपत्रे मिळाले नाहीत. त्यामुळे तो परदेशी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते. पाच दिवस त्याचा मृतदेह ओळखीसाठी ठेवला होता. मात्र, ओळख न पटल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओळख पटली असती, तर पासपोर्ट विभागाला कळवले असते. त्याचे छायाचित्र काढून ठेवले आहेत. 
- डॉ. प्रभाकर बुधवंत, पोलिस अधीक्षक, पुणे रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे पिछाडीवर; सतेज पाटलांचे सहा शिलेदार आघाडीवर; आघाडीवर, पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांची वाचा यादी

Jitendra Awhad: तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग; जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्हा हादरला! दानोळीत सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून; गावच्या राजकारणात होता सक्रीय

टायगर श्रॉफ फुटबॉल खेळायला टर्फवर गेल्याचं हल्लेखोरांना कसं समजलं? पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, तर 'समविचारी'च्या 6 उमेदवारांनी घेतली आघाडी; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे मोठ्या मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT