पुणे

‘एमआयडीसी’तील अतिक्रमणे काढणारच

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांवर झालेली अतिक्रमणांसंदर्भात कोणत्याही प्रकारची समिती नियुक्‍त करण्यात येणार नसून, त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) त्यासंदर्भात स्वतंत्र पथक तयार करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील सहा महिन्यात ते कार्यान्वित होणार आहे. राज्यात पिंपरी-चिंचवड, ठाणे या भागात एमआयडीसीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नव्याने नेमण्यात येणाऱ्या पथकाच्या माध्यमातून ती काढून टाकण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. 

एमआयडीसीच्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी बऱ्याचदा प्रशासनाला स्थानिक महापालिकेचे अधिकारी, पोलिस यांची मदत घ्यावी लागते. मात्र अनेक कारणांमुळे ही मदत वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. परिणामी अनेकदा हे काम रेंगाळते. त्यामुळे महामंडळाने यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून महामंडळाने स्वतंत्र पथक तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

एमआयडीसीच्या अनेक जागांवर झोपडपट्ट्या उभ्या आहेत. तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे देसाई यांनी नमूद केले. एमआयडीसीच्या जागांवर उभ्या राहिलेल्या झोपड्याच्या ठिकाणी पात्र नागरिकांना पक्‍की घरे देण्याची योजना राबवायची आणि उरलेल्या जागेवर औद्योगिक महामंडळ उद्योगाच्या विकासासाठी वापरेल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून त्या ठिकाणी राहणाऱ्या पात्र नागरिकांना पक्‍की घरे मिळतील आणि राहिलेल्या जागेवर उद्योगांचा विकास करता येणे शक्‍य होणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

‘सहा महिन्यांत गती येईल’
एमआयडीसीच्या जागांवर असणाऱ्या अतिक्रमणांसंदर्भात गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासंदर्भात आजतागायत काही झालेले नाही. एमआयडीसीकडून अतिक्रमण काढण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या पथकात पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. पुढील सहा महिन्यांत या पथकाची स्थापना झाल्यानंतर अतिक्रमणे हटविण्याच्या कामाला गती येण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT