पुणे

योजनांच्या लाभासाठी पालिकेकडे विक्रमी अर्ज

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे यंदा इच्छुकांचे विक्रमी ३९ हजार ८२५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी व तपासणी नागरवस्ती विभागाने हाती घेतली असून, ते काम पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या महिला बालकल्याण योजना, मागासवर्गीय, अपंग आणि अन्य कल्याणकारी योजनांसाठी अर्ज आले आहेत. गत वर्षी २०१६-१७ १४ हजार अर्ज आले होते. या वेळी जवळपास अडीचपटीने जादा अर्ज दाखल झाले आहेत. नागरवस्ती विभागामार्फत काही योजना ठराविक कालावधीसाठी; तर काही वर्षभर राबविल्या जातात. एक एप्रिल २०१७ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत शहरातील ४४ नागरी सुविधा केंद्रांमार्फत महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग आणि इतर अशा चार प्रमुख कल्याणकारी योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आणि विभागाकडे ३९ हजार ८२५ अर्ज आल्याचे समाजविकास अधिकारी तथा माहिती अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितले.

विभागामार्फत आलेल्या अर्जांची छाननी करून प्राधान्यक्रम निश्‍चित केला जाणार आहे. त्यासाठी दररोज कार्यालयीन वेळेत तपासणीचे काम सुरू आहे. 

समूह संघटक, समाजसेवक, सहायक समाज विकास अधिकारी आणि समाज विकास अधिकारी अशा चार टप्प्यांद्वारे अर्जांची छाननी सुरू राहील. प्राधान्य यादी जाहीर केली जाणार असल्याचे ऐवले यांनी सांगितले. अर्जात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित अर्जदाराला पत्र पाठवून दुरुस्तीची किंवा अर्ज पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थी उमेदवाराला संबंधित योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

योजनेनुसार प्राप्त अर्ज
योजना                                 अर्ज

महिला व बालकल्याण -         २५,३२९
मागासवर्गीय कल्याणकारी -     ७,२९९
अपंग कल्याणकारी -                १,३४८
इतर कल्याणकारी -                ५,५३९
एकूण अर्ज -                          ३९,८२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT