Lokmanya Tilak Award presented to PM Narendra Modi eSakal
पुणे

Lokmanya Tilak Award: PM मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव

टिळक प्रतिष्ठान स्मारक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.

Amit Ujagare (अमित उजागरे)

PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023 Sharad Pawar at Pune)

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.

पुरस्काराचं स्वरुप काय?

लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यातील १ लाखांची रक्कम पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 'नमामी गंगे' या गंगा नदी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी देण्यात येण्यात आली.

PM मोदींना का दिला पुरस्कार?

पंतप्रधानांची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात याबाबत सांगताना दीपक टिळक म्हणाले, "लोकमान्यांनी यावेळी सर्व विश्वस्त चर्चेसाठी एकत्र आले तर आमच्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक, बलाढ्य हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं होतं.

राष्ट्रीयत्व, हिंदुस्तानची पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितलं होतं. तेच सूत्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्राच्या मागे आहे.

त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण हे त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे," असं दीपक टिळक यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT