कोथरूड - सुतार दवाखान्यात झाकून ठेवलेले सीटीस्कॅन मशिन. 
पुणे

#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

सकाळ वृत्तसेवा

पौड रस्ता - महापालिकेबरोबर करार होऊन दोन वर्षे झाली, तरी सुतार दवाखाना येथील सीटीस्कॅन मशिन अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना प्रचंड आर्थिक ताण आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डॉ. अभिजित मोरे म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेला स्वस्तात आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने महापालिकेने एका खासगी कंपनीबरोबर २०१७ मध्ये दहा वर्षांचा करार केला. त्यानुसार कोथरूड परिसरातील कै जयाबाई नानासाहेब सुतार मॅटर्निटी होम या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सीजीएस दराच्या सहा टक्के कमी दराने रेडिओलॉजी सेवा सुविधा पुरवण्याबाबत स्थायी समितीने मान्यता दिली. ४ जानेवारी २०१८ ला या कामाची वर्कऑर्डर निघाली; परंतु गेली दोन वर्षे झाले तरी सुतार दवाखान्यात अद्यापही एमआरआय व इतर सुविधा सुरू झालेल्या नाहीत. त्यासाठी लागणारी उपकरणे बसवण्यात आलेले नाहीत. जनता या सुविधांपासून वंचित आहे. या कंपनीवर अद्यापही कारवाई का करण्यात आली नाही?’  

अमोल बगाडे म्हणाले, ‘लोकांना कमी दरामध्ये रेडिओलॉजीची सुविधा उपलब्ध करून द्यावी; अन्यथा संबंधित करार रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. डॉ. अभिजित मोरे, प्रा. सुहास पवार यांनी त्यासंदर्भातचे निवेदन आयुक्त व आरोग्यप्रमुखांना दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.’

यासंदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, करारानुसार या मशिनसाठी लागणारा विद्युत पुरवठा महापालिकेने आम्हाला करून दिलेला नाही. त्यामुळे मशिन येऊन पडले आहे; परंतु वापरता येत नाही, अशी स्थिती झाली आहे.’

विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले, ‘मशिनसाठी आवश्‍यक असणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी रस्ता खोदून केबल टाकावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिने कालावधी लागेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

Commonwealth Games 2026 स्पर्धेत क्रिकेटसह कुस्ती, बॅटमिंटनचा समावेश का केलेला नाही? कारण घ्या जाणून

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

SCROLL FOR NEXT