पुणे

पीएमपीत लवकरच ४२५ ‘एसी’ बस

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात नव्या ४२५ वातानुकूलित (एसी) बस २६ जानेवारीपर्यंत दाखल होणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सध्याच्याच भाडेदरात ‘एसी’ बस प्रवाशांना उपलब्ध होणार असल्यामुळे शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे. नव्या बसमधील २५ ई-इलेट्रिक, तर ४०० बस या सीएनजीवर धावणाऱ्या असतील.

पीएमपीच्या संचालक मंडळाने १५० ई-बस आणि दोन्ही महापालिकांच्या निधीतून ४०० बस विकत घेण्यासाठी या पूर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच ई-बसची चाचणीही नुकतीच घेण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर बस विकत घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया आता पार पडली असून, येत्या आठवडाभरात संबंधित कंपन्यांना कार्यआदेश दिले जातील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. १५० पैकी २५ ई- बस पहिल्या टप्प्यात येतील. त्यांची लांबी ९ मीटर असेल. दोन्ही शहरांच्या मध्यभागातही त्या वापरता येतील. तसेच सीएनजीवर धावणाऱ्या बस या १२ मीटर रुंदीच्या असतील. या बस बीआरटी मार्गांसाठीही उपयुक्त ठरतील. त्यातून बीआरटीची वाहतूक सुरळीत होऊ शकेल. पहिली तीन वर्षे या बसची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपन्या करणार आहेत. तसेच कोणतीही भाडेवाढ न करता या एसी बस प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या अपुरी असल्यामुळे दोन्ही शहरांत चांगली सेवा देण्यावर मर्यादा येत आहे. २६ जानेवारीपर्यंत नव्या बस दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. 
- नयना गुंडे,अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

बसची संख्या तातडीने वाढविल्याशिवाय पीएमपीची परिस्थिती सुधारणार नाही. म्हणूनच नव्या बस तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- सिद्धार्थ शिरोळे,संचालक, पीएमपी 

पीएमपीमध्ये नव्या बस हव्यातच. आमच्या मार्गावर बसची संख्या खूप कमी असल्याने अनेकदा हाल होतात. उपनगरातील प्रवासी केवळ पीएमपीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे नव्या बस लांबच्या मार्गावर सोडल्या पाहिजेत. 
- अभिजित शिंदे, प्रवासी, रा. कोंढणपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT