PMPML Bus News sakal
पुणे

PMPML Bus News : पी.एम.पी.एल. बस मधून प्रवास करताना सोन्याच्या चैन लंपास ; चार दिवसात दोन घटना,३७ ग्रॅम वजनाचे सोने चोरीस

पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास झाल्याच्या दोन घटना चार दिवसात घडल्या. या दोन्ही घटनेत एकूण ३७ ग्रॅम वजनाच्या दोन चैन चोरीला गेल्या.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास झाल्याच्या दोन घटना चार दिवसात घडल्या. या दोन्ही घटनेत एकूण ३७ ग्रॅम वजनाच्या दोन चैन चोरीला गेल्या. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत टाटा गार्डन येथून पेरणे फाटा असा पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन लंपास केली. याप्रकरणी वडगावशेरी येथील महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत पुणे मनपा ते केसनंद फाटा असा पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी ६० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची चैन लंपास केली.

याप्रकरणी वाघोली येथील वृद्धाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वीही बसने प्रवास करीत असताना सोने व रोकड लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास होत असल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र या चोरी उघडकीस येत नाहीत. चोरटे चोरी केल्यानंतर बस मधून उतरून जातात. चोरी झाल्याचेही उशिरा लक्षात येते. पोलीसांनी पी एम पी एल बस मध्ये गस्त ठेवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT