PMRDA sakal
पुणे

पुणे : ‘पीएमआरडीए’चा ‘डीपी’ लांबणीवर

पुढील आठवड्यात आता ही बैठक होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुख्यमंत्री (uddhav thackeray) पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. यामुळे समाविष्ट २३ गावांसह पीएमआरडीए (PMRDA) हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी बोलविण्यात आलेली पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. यामुळे पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा लांबणीवर पडला आहे. पुढील आठवड्यात आता ही बैठक होण्याची शक्यता आहे. (PMRDA DP on extension)

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर नियोजन समितीची पहिली बैठक सोमवारी (ता. २६) बोलविण्यात आली होती. या बैठकीत २३ गावांसह पीएमआरडीए हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. परंतु, नगर विकास मंत्री शशिकांत शिंदे यांच्या समावेत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत पीएमआरडीएकडून तयार केलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT