पुणे

अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा दिखावा

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंगविरुद्ध ‘कठोर कारवाई’ सुरू केल्याचे दाखवत मोहीम जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात ती फक्त ‘फार्स’ ठरत असल्याची स्थिती आहे. शेकडो अनधिकृत होर्डिंग्ज अद्याप जागेवर उभे आहेत, तर काही ठिकाणी फक्त ‘निवडक’ हटवणी होत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे.
‘पीएमआरडीए’ हद्दीत राज्य, तसेच राष्ट्रीय महामार्ग, एमआयडीसी, मोठी शहरे आणि काही गावांचाही समावेश आहे. काही गावे वेगाने विकसित होत आहेत. अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग, गृहप्रकल्प तेथे येत आहेत. त्यामुळे परिसरात शेकड्याने होर्डिंग लागल्याचे दिसून येत आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल रोजी होर्डिंगबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला कठोर कारवाईचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होर्डिंगधारकांवर थेट ‘हातोडा’ चालवण्याचे आदेश दिले. १३ एप्रिलपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मात्र, महिनाभरात फक्त आठच ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यातही निवडक फलकांवर कारवाई करण्यात आली. मोठ्या कंपन्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या होर्डिंगला ‘संरक्षण’ आणि फक्त छोट्या किंवा ‘सॉफ्ट टार्गेट’वर कारवाई होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. प्रशासनाकडून होर्डिंग हटवल्याचे दावे करण्यात आले. हवेली, मुळशी, भोर, हिंजवडी, लोणीकंदसह काही भागांत ‘कारवाई’ दाखवली गेली, पण पुणे-नगर महामार्ग, हिंजवडी आयटी पार्क परिसर आणि इतर मुख्य रस्त्यांवर अजूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग दिसत आहेत.

नोटीस आणि मुदत
अनधिकृत होर्डिंग मालकांना अनेकदा नोटीस दिल्या जातात, डेडलाइन जाहीर केल्या जातात. पण, अनेक होर्डिंग मालकांकडून नियमितीकरणासाठी पैसे भरले जातात आणि प्रकरण तहकूब होते. उल्लंघनकर्त्यांवर थातूरमातूर कारवाई होते, पण होर्डिंग मात्र जागेवरच राहत असल्याची वस्तूस्थिती आहे.

एकत्रित माहितीच उपलब्ध नाही
‘पीएमआरडीए’ हद्दीतील मुळशी, मावळ, हवेली, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा होर्डिंग उभारण्यात आले आहेत. यासंदर्भात नियमांचे पालन केले आहे का, होर्डिंग उभारताना सुक्षरचे निकष पाळले गेले आहेत का, शुल्क भरले आहे का, हद्दीत किती अधिकृत आणि किती अनधिकृत होर्डिंग आहेत, याची एकत्रित माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

दिवस ठिकाण आणि कारवाई
१३ एप्रिल : हिंजवडी एक होर्डिंग
१७ एप्रिल : लोणीकंद एक होर्डिंग
५ मे : हवेली, भोरमधील दोन होर्डिंग
६ मे : खेड शिवापूर दोन होर्डिंग
१८ मे: भूगाव एक होर्डिंग
१९ मे: खेड शिवापूर एक होर्डिंग


होर्डिंगमुळे घडलेल्या दुर्घटना
एप्रिल २०२३ : कात्रज -देहू बाह्यवळण मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून पाच नागरिकांचा मृत्यू
१५ मे २०२५ : मुळशी येथील भुकुममध्ये जोरदार वाऱ्यामुळे दोन मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

Video : अखेर सरकार खऱ्या रूपात सखीसमोर येणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकही हैराण; "तेजस्विनीला परत आणा"

IPL 2026 : विराट कोहलीचा 'पार्टनर' परतणार, RCB प्ले ऑफमध्ये राडा घालणार… गतविजेत्यांना मिळालं बळ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT