rayreshwar 
पुणे

पोलिस आल्याचे समजताच शिवभक्तांची एकच पळापळ

विजय जाधव

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेल्या रायरेश्वरावर शंभूमहादेवाचे दर्शन घेण्यासाठी आज श्रावणी सोमवारमुळे पर्यटकांबरोबर भाविकांनीही गर्दी केली. किल्ल्याच्या पायथ्याशी शिडीजवळ पर्यटकांच्या अनेक दुचाकी व मोटारी उभ्या होत्या. पोलिस आल्याची माहिती मिळताच पर्यटकांनी पोबारा केला आणि पोलिसांना कारवाईविनाच परतावे लागले. 

भोर व वाई (जि. सातारा) तालुक्यातील शेकडो पर्यटक आणि भाविक रायरेश्वरावर आले होते. लॉकडाउनमुळे तालुक्यातील पर्यटनक्षेत्र आणि किल्यांवर फिरण्यास बंदी आहे. परंतु, अनेकांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे प्रशासनास कारवाई करण्यास उशीर होतो. भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील गावांमधील तरुण-तरुणींनी रायरेश्वरावर जाऊन वनभोजन करण्याची तयारी केली होती. काहींनी जेवण बनविण्याचे सर्व साहित्यही सोबत नेले होते. रविवारी (ता. २६) रायरेश्वरावर पर्यटक आले असल्याची माहिती भोर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सोमवारी सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत होते. परंतु, दुपारी बाराच्या सुमारास पोलिस कारवाई करण्यासाठी रायरेश्वराकडे निघाले असल्याची खबर काही पर्यटकांना मिळाली. त्यामुळे पोलिस पोहोचण्यापूर्वीच अनेक हौशी पर्यटक गायब झाले. पोलिस तेथे गेल्यावर त्यांना केवळ दोन- चार मोटारीतून आलेले पाच-सहा पर्यटक आढळून आले. त्यामुळे पोलिसांची निराशा झाली. 

वाईवरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती. लॉकडाउनमुळे तालुक्यात पुण्या- मुंबईहून गावी आलेल्यांची संख्या भरपूर म्हणजे लाखाच्या घरात आहे. गावाकडे फारसा कामधंदा नसल्यामुळे ते इतरत्र फिरत असतात. त्यांच्यासोबत गावातील काही तरूणही सामील होतात. यामध्ये काही पोलिस मित्रांचाही समावेश आहे. पोलिस कारवाई करण्यासाठी येणार असल्याची माहितीही त्यांना लगेचच मिळते. त्यामुळे कारवाई होण्यास विलंब होतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अटकेनंतर पोलिसांसमोरच आरोपींनी मिश्यांना दिला पीळ, गुन्ह्याचा अभिमान असल्याचा अविर्भाव; चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही, VIDEO VIRAL

IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?

Ulhasnagar: उपचारासाठी रात्रभर धावपळ, पण वाचवता आलं नाही; एनआयसीयू अभावी चिमुकलीचा मृत्यू

'मी खोटा लैंगिक छळाचा आरोप केलेला 'भाभाजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदेची तब्बल ११ वर्षांनी कबुली, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : खोणी गावातील भाजपप्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेत, गैरसमजातून प्रवेश केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT