Pune Porsche Accident  Esakal
पुणे

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम १४ दिवसांनी वाढणार? पोलिसांचा बाल न्याय मंडळाला अर्ज

Pune Porsche Accident : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १२ ः  कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा अर्ज पुणे पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज बुधवारी (ता. १२) दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला आहे.

दरम्यान मुलाला पाच जूनपर्यंत बाळसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला होता. नंतर त्यात सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला होता. अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत देखील त्याला समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती त्यावेळी मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी मंडळाला दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT