Police Patil
Police Patil sakal
पुणे

Police Patil Recruitment : पोलिस पाटलांच्या रिक्त १३३ जागा लवकरच भरणार; ३० जूनला आरक्षण सोडत

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील भोर व वेल्हे या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या १३३ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. यापैकी काही जागा या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित राखीव असणार आहेत. या राखीव जागांची गावे निश्‍चित करण्यासाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

ही आरक्षण सोडत भोर शहरातील महाड नाका येथे असलेल्या अभिजित मंगल कार्यालयात ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. यामध्ये भोर तालुक्यातील ७२ तर, वेल्हे तालुक्यातील ६१ पदांचा समावेश असल्याचे भोरचे प्रांत राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

भोरमधील रिक्त पदे असलेली गावे - नांद, पसुरे, म्हाकोशी, बारे बुद्रूक, वाठार, चिखलावडे बुद्रूक, भिलारेवाडी, कुंबळे, पिसावरे, रांजे, कुसगाव,चिखलावडे खुर्द, भाडवली, दुर्गाडी, कुडाली खुर्द, सांगवी, नानावळे, वावेघर,अभेपूरी, बोपे, गृहिणी, वेणूपुरी, गुढे, वेळवंड, नऱ्हे, महुडे खुर्द, कारुगण, किवत, वर्वे खुर्द, विरवाडी, भोंगवली, राजीवडी, कुंड, करंदी खुर्द, करंजे, कांबरे खुर्द, कोर्ले, डेहणे, उबार्डे, जयतपाड, देवघर, नांदगाव, निगडे, निगुडघर, निवंगण, माझेरी, म्हाळवडी, वरोडी डायमुख, साळुंगण, हिर्डोशी, कुडली बुद्रूक, राजघर, शिवनगरी, माळेगाव, सांगवी खुर्द, सोनवडी, करंदी , करंदी बुद्रूक, माजगाव, सांगवी तर्फे भोर, तळजाईनगर, दिवळे, केतकावणे, आंबेघर, वाठार हिंगे, सावरदरे, गुणंद, भांबवडे, शिंद, तळे म्हसवली, कांबरे.

वेल्हे तालुक्यातील गावे - आसनी मंजाई, आसनी दामगुडा, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, एकलगाव,ओसाडे, कर्नावडी, कानंद, कांबेगी, कुरवटी, कुर्तवडी, कोळवडी, कोंडगाव, कोंढवली, कोंढावळे खुर्द, खामगाव, खोडद, गुगुळशी, धावर, धिसर, मार्गासनी, घोल, भागिनघर, चांदर, कोलंबी, जाधववाडी, ठाणगाव, दादवडी, दापसरे, दापोडे, धानेप, धिंडली, निवी, पाबे, पाल बुद्रूक, पांघारी, पिशवी, पिंपरी, बार्शीमाळ, बालवड, वरोती खुर्द, ब्राम्हणघर, भालवडी, माजगाव, माणगाव, मोहरी, रानवडी, लव्ही खुर्द, वडगाव झांजे, वांगणी, कातवडी, वांजळे, वरसगाव, वेल्हे बुद्रूक, वेल्हे बुद्रूक घेरा, शिरकोली, सूरवड, हिरपोडी, मालवली, घोडकल व गिवशी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Earth's Core Slowing Down : पृथ्वीच्या गाभ्याचं फिरणं झालंय कमी;दिवसाच्या लांबीवर परिणाम?संशोधनातून समोर आलेलं रहस्य जाणून घ्या

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

SCROLL FOR NEXT