DSK Case Sakal
पुणे

Pune News : डीएसके यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा ताबा द्यावा; ठेवीदारांचा विशेष न्यायालयात अर्ज

डीएसके यांनी विविध प्रकारच्या आठ कंपन्या सुरू करून त्याद्वारे ठेविदारांच्यामार्फत आठ हजार पाचशे कोटी रुपये जमा केले. या पैशांचा त्यांनी विविध मार्गांनी गैरव्यवहार केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (डीएसकेडीएल) यासह विविध भागीदारी कंपन्यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा दाबा मिळावा असा अर्ज काही ठेवीदारांनी मुंबर्इ येथील विशेष न्यायालयात केला आहे. डीएसके यांच्याकडे ठेवी ठेवलेल्या १६० गुंतवणुकदारांनी याबाबतचा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र विशेष न्यायाधीश एस. सी. डागा यांच्या न्यायालयात दाखल केले आहेत.

डीएसके यांनी विविध प्रकारच्या आठ कंपन्या सुरू करून त्याद्वारे ठेविदारांच्यामार्फत आठ हजार पाचशे कोटी रुपये जमा केले. या पैशांचा त्यांनी विविध मार्गांनी गैरव्यवहार केला. डीएसके यांनी ठेवीदारांच्या पैशातून मालमत्ता विकत घेतल्या आहेत. तसेच नातेवाइकांच्या नावाने कमी दरात जमीनी घेतल्या. मात्र अद्याप अनेक ठेवीदारांचे पैसे परत केलेले नाही.

त्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी डीएसके यांच्या विविध भागीदारी कंपन्यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची मालकी ठेवीदारांना देण्यात यावी. या मालमत्तांची ‘रेड हाउस फाउंडेशनच्या माध्यमातून विक्री करून त्याद्वारे ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असे अर्जात नमूद आहे. ठेवीदारांचे वकील ॲड. चंद्रकांत बिडकर यांच्यामार्फत हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

डीएसके यांच्या भागीदारी संस्थांच्या नावाने असलेल्या आणि कोणताही दावा सुरू नसलेल्या मालमत्ता ठेवीदारांना मिळाव्यात असे अर्ज ठेवीदारांनी केले आहेत. त्या मालमत्तांचा मालकी हक्क ठेवीदारांना मिळाल्यानंतर त्यांची ‘रेड हाऊस फाउंडेशनच्या मार्फत विक्री केली जार्इल व त्यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असे अर्जात नमूद. या मालमत्तेची हमी आम्ही स्वीकारली असून त्यास ठेवीदारांनी देखील मान्यता दिली आहे.

- शंतनू कुकडे, अध्यक्ष, रेड हाऊस फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT