भीमा नदीकाठचा
वीजपुरवठा ३१पर्यंत बंद
‘उजनी’तून पिण्यासाठी सोडले पाणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी शनिवारपासून (ता. २४) ३१ ऑक्टोबरपर्यंत सहा तालुक्यांतील नदीकाठच्या परिसरात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.
पण, अत्यावश्यक सेवांसाठी दररोज तीन तास वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला शहरांसह भीमा नदीकाठच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी सुरळीतपणे अरळी (ता. मंगळवेढा) बंधाऱ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी नदीकाठच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे उजनीतून सोडलेले पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नदीपात्रातून पाण्याचा शेतीपंपांद्वारे उपसा झाल्यास ते पुढील बंधाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होतो, तसेच कर्नाटक हद्दीलगतच्या महाराष्ट्रातील शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी नेण्यात अडचणी येतात. त्यामुळे प्रशासनाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या कालावधीत शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद राहिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मोठी मदत होईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
--- चौकट ---
तालुकानिहाय वीजखंडित करण्याचे वेळापत्रक :-
माढा : २४ ते ३१ ऑक्टोबर
माळशिरस : २५ ते ३१ ऑक्टोबर
पंढरपूर : २६ ते ३१ ऑक्टोबर
मोहोळ : २९ ते ३१ ऑक्टोबर
मंगळवेढा व दक्षिण सोलापूर: ३० ते ३१ ऑक्टोबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.