वीजचोरी  sakal
पुणे

पुणे : तब्बल १८ लाखांची वीजचोरी उघड

या ग्राहकाने गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत ४२ हजार ७७० युनिट वीजचोरी केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फुरसुंगीमधील भेकराईनगर तसेच भोर तालुक्यातील ससेवाडी येथील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुरू असलेली १८ लाख ११ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने नुकतीच उघडकीस आणली आहे.

भेकराईनगर येथील शिवशंकर हाइट्स परिसरातील १८ वीजग्राहक वीजमीटरला बायपास करून थेट वीजवापर करीत असल्याचे भरारी पथकाच्या तपासणीमध्ये आढळून आले. यामध्ये १७ घरगुती व एका वाणिज्यिक ग्राहकांनी ५४ हजार १४ युनिटची म्हणजे ६ लाख ६५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या वीजबिलासोबतच त्यांना १ लाख ८ हजार रुपयांच्या दंडाचे वेगळे वीजबिल देण्यात आले आहे, तसेच ससेवाडी येथील एस. पी. एंटरप्रायझेस या औद्योगिक ग्राहकाच्या वीजसंचाची भरारी पथकाने तपासणी केली असता केबलला जमिनीखाली टॅपिंग करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले.

या ग्राहकाने गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत ४२ हजार ७७० युनिट म्हणजे ७ लाख २८ हजार रुपयांची वीजचोरी केली आहे. त्यास वीजचोरीचे वीजबिल व ३ लाख १० हजार रुपयांच्या दंडाचे वेगळे बिल देण्यात आले आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ पाटील व नरेंद्र रडे, उपकार्यकारी अभियंता कैलास काळे व आवधकिशोर शिंदे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी अश्विनी भोसले, तंत्रज्ञ गणेश कराड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT