Pradeep Gaikwad statement caste system dissolve and identify us Indians pune sakal
पुणे

Pune News : आमची ओळख जाती नव्हे, तर भारतीय झाली पाहिजे; प्रवीण गायकवाड

गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची शांतता देशाला बहाल केली पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षा प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : भारताच्या लोकशाहीचा कारभार राज्य घटनेच्या तत्त्वानुसार सुरू आहे. जगातील सर्वात मोठी राज्य घटना आहे. देशातील जाती व्यवस्था विसर्जित करून आमची ओळख भारतीय म्हणून झाली पाहिजे. गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची शांतता देशाला बहाल केली पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षा प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

कॅम्पमधील डॉ. कोयाजी रस्ता (सिल्व्हर ज्युबली पेट्रोल पंपासमोर) येथील मराठा वॉर मेमोरिअलला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे मुख्य समन्वयक राजाभाऊ चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी तृतीयपंथीयाच्या देश पातळीवर सदैव कार्यरत असलेल्या गौरी सावंत, मराठा क्रांती स्वराज्य संस्थेच्या महिला अध्यक्षा संध्या राणे, महात्मा फुले पुणे माळी समाजाचे अध्यक्ष मधुकर राऊत, अलका फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका गुंजनाळ, अॅड. प्रताप परदेशी, राजाभाऊ चव्हाण, निखील टेकवडे, ऋषिकेश पवार, विजय महाडिक, शिवाजी शिंदे, नंदकिशोर बुट्टे-पाटील, संध्या राणे, राजवर्धनी जगताप उपस्थित होते.

दरम्यान, गौरी सावंत म्हणाल्या की, जातीपलीकडे आमचा समाज आहे. आम्ही हिंदु-मुस्लीम, ख्रिश्चन म्हणून भीक मागत नाही. पोट भरण्यासाठी भीक मागतो. आता आमच्या 70 महिला पोलीस भरती झाल्या आहे. आमचा समाज टाळ्या नाही, तर हातात कायदा आणि बंदूक घेऊन कायदा सुव्यवस्थेचे काम करीत असल्याचे समाधान वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

SCROLL FOR NEXT