pawar 
पुणे

'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार हे सोळा वर्षांपासून या संस्थेशी संबंधित आहेत. यापूर्वी ते संस्थेच्या वित्त समितीचे अध्यक्ष होते. 

Video : केरळच्या `त्या` हत्तीणीला पुण्याच्या `या` हरिणीचा वाटत असेल हेवा....

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या नियुक्तीचा आदेश आज काढला. प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. "पर्सिस्टंट'चे अध्यक्ष आनंद देशपांडे हेदेखील या महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य असतील. 

या नियुक्तीबद्दल "सकाळ'शी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले, ""पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाशी मी गेल्या सोळा वर्षांपासून निगडित आहे. याकाळात डॉ. एफ. सी. कोहली यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या आणि कामाशी अत्यंत एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीबरोबर आणि नियामक मंडळातील अन्य तज्ज्ञ व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या सहकार्यामुळे "सीओईपी'साठी खूप काम करता आले. महाविद्यालयाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये योगदान देता आले. त्यासाठी डॉ. कोहली व अन्य सदस्य यांचे आभार मानले पाहिजेत. संस्थेतील प्राध्यापक आणि अन्य सर्व सहकाऱ्यांनीदेखील मनापासून काम केले. त्यामुळे सातत्याने सुधारणा होत गेल्या. यापुढील काळातही हीच प्रथा कायम राहील, यात शंका नाही.''

""माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे मोशी येथे संस्थेला तीस एकर जागा मिळाली आहे. मागील सरकार आणि आताचे सरकार यांनी तेथील विस्तारासाठी दीडशे कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. यामुळे तेथे आधुनिक संस्था उभी करण्यास मदत होईल; तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांसारखे भविष्य काळाचे विषय असलेले केंद्र उभे करता येईल. त्यासाठी प्रमोद चौधरी, डॉ. संजय धांडे आणि आनंद देशपांडे हे नियामक मंडळात असतील. याशिवाय अन्य काही तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल,'' असे श्री. पवार यांनी सांगितले. 

अभ्यासक्रमात घेणार महत्त्वाचे विषय 
"सीओईपी'तील विकासासाठी काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत दिली आहे. त्याचे काम तत्काळ सुरू होईल. यातून नजीकच्या काळात मेटलर्जी, मॅकेनिकल आणि कॉम्प्युटर इंजिनियरिंग हे विभाग आणि ग्रंथालयाचे काम पूर्ण होईल. हा कामाचा पहिला टप्पा असेल. त्यानंतर मोशीतील विस्ताराच्या कामास सुरुवात केली जाईल. याशिवाय भविष्यासाठी महत्त्वाचे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील. देशातील एक अग्रगण्य संस्था करण्याचा जो सरकारचा मानस आहे, त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न असेल,'' असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT