baby
baby e sakal
पुणे

Pune News : कर्नाटकांतील गर्भवती महिलेने अनुभवली भिगवण व महाऱाष्ट्राची माणुसकी

डॉ. प्रशांत चवरे

भिगवण : माणुसकीचा झरा आटत आहे असे वाटत असतानाच कर्नाटकातील एका गर्भवती महिलेला महाराष्ट्र व भिगवणकराच्या माणुसकीचा सुखद अनुभव आला. कर्नाटक राज्यातील एक गर्भवती महिला पुण्याहुन खासगी बसने कर्नाटकातील गावी जात असताना अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या.

बस चालकांने सदर महिलेस भिगवण येथे सोडले. त्यानंतर स्थानिक व डॉक्टरांच्या सहकार्यातुन सदर महिलेची राष्ट्रीय महामार्गावरच सुखरुप प्रसुती करण्यात आली. रात्री अपरात्री संकटात सापडलेल्या कर्नाटकातील महिलेला माणुसकी व सेवाभावी वृत्तीचा सुखद अनुभव मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी ः कर्नाटक राज्यातील एक गरोदर महिला ही खासगी बसने पुण्याहुन कर्नाटकातील गावी निघाली होती. बस भिगवणच्या जवळपास आली असताना सदर महिलेस अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. बस चालकांने रात्री दोनच्या सुमारास महिलेस भिगवण येथे राष्टीय महामार्गावर सोडले.

त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित स्थानिक नागरिकांनी महिलेची अवस्था पाहून प्रथम १०८ क्रमांकावर संपर्क साधुन सरकारी रुग्नवाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित स्थानिक रहिवासी रेहान तांबोळी व हजारी देवाशी यांनी सरकारी रुग्नवाहिकेशी संपर्क होत नाही असे लक्षात आल्यानंतर खासगी रुग्नवाहिका चालक केतन वाघ यांचेशी संपर्क साधला.

खासगी रुग्न वाहिका चालक केतन वाघ तातडीने घटनास्थळी दाखल झाला त्यानंतर रेहान तांबोळी,हजारी देवाशी व केतन वाघ यांनी सरकारी व खासगी रुग्नालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथील लाईफलाईन हॉस्पिटलच्या डॉ. योगिता भोसले यांचेशी संपर्क होताच त्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्या. महिलेची अवस्था पाहुन डॉ. योगिता भोसले यांनी सदर महिलेची राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला प्रसुती केली व त्यानंतर पुढील उपचारासाठी सदर महिलेस रुग्नालयांमध्ये दाखल करण्यात केले.

प्रसुतीनंतर बाळ व बाळंतीन जीवावरच्या संकटातुन सुखरुप बाहेर पडले. भिगवणसाऱख्या अनोळखी ठिकाणी माणुसकीच्या भावनेतुन अनेकांनी हात पुढे केले व आणि संकटात सापडलेल्या गरोदर महिलेला महाराष्ट्र व भिगवणकरांच्या माणुसकीची सुखद अनुभव मिळाला. शेवटी खासगी रुग्नवाहिकेतुन सदर महिला व बाळाची तिच्या गावी रवानगी करण्यात आली. महिलेला मराठी भाषा येत नव्हती परंतु तिच्या चेहऱ्यावर व डोळ्यात कृतज्ञतेची भाषा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT