MAO26B04098
मळेगाव (ता. बार्शी) ः येथे प्रसन्नदाता बचत गटाच्या वर्धापनदिनानिमित्त एकत्रित जमलेले पदाधिकारी अन् सदस्य.
‘श्री प्रसन्नदाता’कडून दहा विद्यार्थ्यांना एनआयईचा अंक
मळेगाव ः येथील श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी उद्योजक सुरज गडसिंग होते. गणेश घाडगे, मेजर पांडुरंग नलवडे अन् यशदाचे शिवाजीराव पवार उपस्थित होते.
शिवाजीराव पवार यांनी युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन केले. ‘सकाळ’मार्फत सुरू करण्यात आलेल्या एनआयई शैक्षणिक अंकासाठी प्रसन्नदाता बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष संताजी आलाट यांनी दहा विद्यार्थी दत्तक घेतले. सर्वानुमते अध्यक्षपदी प्रमोद माने, तर सचिवपदी वैभव जामदार यांची निवड करण्यात आली. समाधान आपुणे यांचा उत्कृष्ट सभासद म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी गावातील युवक, गटाचे पदाधिकारी अन् सदस्य उपस्थित होते. बालाजी आलाट यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.