‘पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा’
जालना : मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप पुढे करून कट रचल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हस्तक्षेप करावा, अशी मागणी जरांगे यांनी शनिवारी (ता. २४) अंकुशनगर येथे पत्रकार परिषदेत केली. ‘‘मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेतला म्हणून मला संपवण्यापर्यंत काही लोक का गेले,’’ असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. आपण यापूर्वी कधीही समोर न आलेल्या बाबी उघड केल्या असून, या प्रकरणाचा पडदा फाडला आहे, असे जरांगे म्हणाले. व्हायरल ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे यांनी रामदास कदम, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले.
लाड यांनी प्रकरणाच्या मुळाशी जावे
‘प्रसाद लाड यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे. मित्रत्वापोटी या प्रकरणाचा तपास थांबवण्याची वेळ येऊ देऊ नये. मी त्यांना सांगतो की क्लिप खरी आहे,’ असे जरांगे म्हणाले. संजय राऊत यांनी ही क्लिप तयार केली असावी का, या प्रश्नावर त्यांनी हा त्या बाजूचा विषय नसल्याचे सांगत दावे-प्रतिदाव्यांपेक्षा सत्य समोर येणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
क्लिप खोटी सिद्ध करण्यासाठी हालचाली
या प्रकरणातून सुटण्यासाठी आणि क्लिप खोटी असल्याचे सिद्ध करण्यासाठी दिल्लीतील हालचाली सुरू होऊ शकतात, असे जरांगे म्हणाले. दिल्लीवारी सुरू झाल्याचे आपल्या कानावर आल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.