PUNEKAR  ESAKAL
पुणे

Narendra modi in pune: एकीकडे विरोध तर दुसरीकडे मोदींना पाहण्यासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने पोलिसांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi in Pune

पुणे- एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक अशा घोषणा देत त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे मोदींची एक झलक पाहण्याची प्रचंड उत्सुकता नागरिकांमध्ये होती. ज्या मार्गाने मोदी जाणार होते, रिमझीम पावसात तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो पुणेकरांनी उभे राहून मोदींचे जोरदार स्वागत केले. ‘मोदी मोदी’, ‘भारत माता की जय’, वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाच, पण मोबाईलवर फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी झुंबड उडाली होती.

PUNEKAR MODI VISIT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने पोलिसांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुकाने बंद होती. या रस्त्यांना येऊन मिळणारे इतर रस्तेही बंद केले होते, तसेच रस्त्याच्या कडेने बांबू लावून बॅरिकेडींग केले होते. पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यानंतर शिवाजी रस्ता, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे नागरिकांनी मोदी यांचे जोरदार स्वागत केले. यामध्ये लहान मुलांसह तरुण, ज्येष्ठ, महिला यांचा समावेश होता. मोदी देखील नागरिकांना बघून हात हलवून प्रतिसाद देत होते.

PUNEKAR FOR MODI

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील दर्शन झाल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर, टिळक रस्त्यासह इमारतीच्या बाल्कनी, टेरेसवरही नागरिकांची मोठी गर्दी होती. अनेक ठिकाणी ‘वेलकम मोदीजी’ असे फलक घेऊन नागरिक उभे होते. तसेच ज्या भागात गर्दी आहे, तेथे मोदी यांच्या गाडीचा वेग कमी केला जात असल्याने नागरिकांच्या जल्लोषात आणखी भर पडून आनंदाने घोषणा दिल्या जात होत्या. जवळून फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्याची धडपडही सुरू होती. असाच अनुभव गोखले रस्त्यावर मोदींच्या स्वागतासाठी जवळपास दीड दोन तास वाट पाहणाऱ्या नागरिकांना आला. दरम्यान उत्साही नागरिक रस्त्यावर येऊ नयेत यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT