पुणे

आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी खेळ

CD

माळशिरस, ता. १९ : माळशिरस (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकाऱ्याऐवजी एका खासगी व्यक्तीद्वारे रुग्णांना औषधे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांनी सोमवारी (ता. १८) रात्री तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या पाहणीत सीसीटीव्ही फुटेजद्वारे हा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी विजय भिलारे यांच्या अनुपस्थितीत, तसेच ते हजर असतानाही गावातील खासगी महिला रुग्णांना औषधे वाटत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसले. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत इंगळे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे, केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभंकर देशमुख, डॉ. प्रियांका साळुंखे आदी उपस्थित होते. औषध निर्माण अधिकारी भिलारे रजेवर असल्याने उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या गैरहजेरीत अनधिकृत व्यक्तीला औषध वाटपाची परवानगी कशी दिली, असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला. याबाबत दोन दिवसांत वरिष्ठ कार्यालयाला सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असे डॉ. विक्रम काळे यांनी सांगितले.

मी दोन वर्षांपूर्वी येथील आरोग्य केंद्रात रुजू झालो आहे. त्या अगोदरपासून संबंधित बाहेरील महिलाही या ठिकाणी काम करत होती. आरोग्य केंद्रात केस पेपर काढण्यासाठी माणसाची आवश्यकता होती. इथून पुढे औषध निर्माण अधिकारी सोडून इतरांकडून औषधे दिली जाणार नाहीत.
- शुभंकर देशमुख, वैद्यकीय अधिकारी

आरोग्य केंद्रात मंजूर शिपाई पदांपैकी एकही शिपाई नसल्याने गावातील जाणकारांच्या सहमतीने खासगी व्यक्ती केस पेपर काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ठेवलेली आहे. ही व्यक्ती फक्त केस पेपर देण्याचे काम करते. काही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात कमी वेळ येऊन आपली खासगी ओपीडी चालवतात. यासाठी येथील औषध नेण्याचा प्रयत्न केला जातो. तो मी होऊ देत नसल्यानेच माझ्यावर आरोप केले जात आहेत.
- विजय भिलारे, औषध निर्माण अधिकारी

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन सर्वच दोषींवर कारवाई करावी व योग्य त्या व्यक्तींची या ठिकाणी नियुक्ती करावी.
- अजय इंगळे, जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT