protest sakal
पुणे

अँमेनिटी स्पेसच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कडून निषेध

यादीत सर्वाधिक जागा या बाणेर म्हणजेच 42 भूखंड तर बालेवाडी येथील 23 भूखंडांचा समावेश आहे

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : महापालिकेच्या 269 जागा अँमेनिटी स्पेस (Amenity Space) (सुविधा क्षेत्र) भाड्याने देण्याच्या निर्णयाविरुद्ध प्र.क्र. 9 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( National congress party) तसेच सोसायटीतील नागरिकांकडून निषेध (protest) मोर्चा काढण्यात आला. याचे कारण महापालिकेने शहरातील अमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) भाड्याने देण्यासाठी तयार केलेल्या यादीत सर्वाधिक जागा या बाणेर (Baner) म्हणजेच 42 भूखंड तर बालेवाडी येथील 23 भूखंडांचा समावेश आहे.

या जागा या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आहेत आणि त्या नागरिकांसाठी असल्या पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीत या जागा बिल्डरच्या घशात जाता कामा नयेत यासाठी बाणेर येथे प्र. क्र. 9 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तसेच सोसायटीतील नागरिकांकडून या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ता. 29 ऑगस्ट रोजी बाणेर येथील कै.बाबुराव सायकर चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी सोसायटीतील प्रतिनिधींनी या निर्णयासंदर्भात त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याबद्दल संताप व्यक्त करत निर्णयास विरोध दर्शविला आहे. या प्रसंगी आनंद गडकर,आरूण सामंत , सिध्देश्वर वानखेडे , संपत कनवडे , सुषमा ताम्हाणे ,रखिताई श्रीराव , पुनम विधाते ,प्रा.रूपाली बालवडकर , अर्जुन शिंदे ,डॉ सागर बालवडकर,जंगल रणवरे ,समीर चांदेरे ,नितीन कळमकर ,विशाल विधाते ,संजय ताम्हाणे,अर्जुन ननावरे ,मनोज बालवडकर ,डॉ मिरा विधाळे , प्रची सिद्दीकी , बाणेर बालेवाडी मधील सोसायटीचे नागरिक ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT