Pune  Sakal
पुणे

Pune : खडकवासला प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा; धरणाची पातळी कमी होत असल्याने..

मुठा उजवा कालव्यातून १००५ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यात अद्याप पाऊस झालेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांत मिळून शुक्रवारअखेर सुमारे २१.१८ टीएमसी म्हणजे ७२.६५ टक्के पाणीसाठा झाला.

मुठा उजवा कालव्यातून १००५ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यात अद्याप पाऊस झालेला नाही. म्हणून पाटस, दौंड, तरंगवाडी व अन्य तलावात कालव्यातून सोडलेल्या पाण्यातून भरण्यात येत आहे.

पाऊस कमी झाल्याने परिणामी धरणात येणारा येवा (इनफ्लो) कमी होत गेला. धरणाची पातळी कमी होत असल्याने नदीत सोडलेला विसर्ग कमी करण्यात आला.

खडकवासला धरणातून मुठा नदीत गुरुवारी रात्री ११ वाजता चार हजार २८० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजता विसर्ग तीन हजार ४२४ क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला.

सकाळी आठ वाजता २५६८, त्यानंतर नऊ वाजता १७१२, ११ वाजता ८५६, १२ वाजता ४२८ क्यूसेक पर्यंत पाणी कमी करण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस थांबल्यामुळे दुपारी एक वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.

आज दिवसभरात खडकवासला येथे दोन, पानशेत येथे नऊ, वरसगाव येथे नऊ, टेमघर येथे १०, मुळशी येथे १५, भामाआसखेड एक, पवना १९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT