pune  sakal
पुणे

Pune Accident : जांभूळवाडी दरीपुलाजवळ अपघात,महामार्गावरील वाहतुक विस्कळीत

तासगावहून राजस्थानला बेदाणा घेवून जात असलेला ट्रक क्रमांक आरजे -५० जीए - २८०९ (RJ-50 GA-2809) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास जात असताना

सकाळ वृत्तसेवा

किशोर गरड

आंबेगाव -साताराकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील असणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने जांभूळवाडी दरी पुलाजवळ असणाऱ्या इंडीयन पेट्रोल पंपा समोर विचित्र अपघात झाला असून यात दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांना नऱ्हे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तासगावहून राजस्थानला बेदाणा घेवून जात असलेला ट्रक क्रमांक आरजे -५० जीए - २८०९ (RJ-50 GA-2809) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास जात असताना त्याचा ब्रेक निकामी झाला असल्याची बाब चालकाच्या लक्षात आली.त्यानंतर चालकाने गाडीवर नियंत्रण मिळविण्याकरिता हॅण्ड असे ब्रेकचा वापर केल्याने ट्रक रस्त्यावर पूर्णपणे आडवा झाला.

शिवाय समोर असलेल्या आयशर क्रमांक एमएच- ११ एएल - ५६९५ ( MH 11AL5695) यावर पाठीमागून आदळल्याने आयशर टेम्पोही पलटी झाला.

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग वाहन घटनास्थळी दाखल झाले.दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने शिंदेवाडी कडून जुन्या कात्रज बोगदा मार्गे वाहतूक वळविण्यात आली असून महामार्गावरील दोन्ही ट्रक बाजूला घेत आल्याची माहिती भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT