pune  sakal
पुणे

Pune : आगामी निवडणुकीत सातशे केंद्रांची भर

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राहिला फक्त पाच महिन्यांचा कालावधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जनगणना आणि मतदार संख्येतील तफावतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मतदार केंद्रांच्या संख्येत जवळपास ७०० केंद्रांची नव्याने भर पडणार आहे. एका केंद्रासाठी किमान पाच कर्मचारी वर्ग धरला, तर किमान ३५०० जण निवडणुकीसाठी लागणार आहे. त्यामुळे हे मनुष्यबळ कसे उभे करायचे, असा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा राहणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या निवडणूकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरणार आहे तर मतदारसंख्या ही २०२१ मधील ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्या जास्त असे चित्र निर्माण होणार आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे त्याचा परिणाम मतदान केंद्रांवरही होईल.

महापालिका निवडणूकीसाठी ८०० ते १००० मतदारांसाठी मतदान केंद्र ग्राह्य धरले जाते. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत साधारणपणे साडेतीन हजार मतदान केंद्र होते. गेल्या १० वर्षांत वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वसाधारणपणे मतदान केंद्रांची संख्या सुमारे सातशेने वाढण्याची शक्यता आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एका केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिळून किमान पाच जणांची नेमणूक करावी लागते. याशिवाय, निवडणुकीसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या संख्येच्या ३० टक्के संख्या ही राखीव म्हणून ठेवावी लागते, असा नियम आहे. हा विचार केला, तर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासाठी प्रशासनाला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

SCROLL FOR NEXT