vaccination sakal
पुणे

पुणे : पाच लाख नागरिकांच्या मोफत लसीकरणाचे ध्येय

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपक्रम; बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या महाअभियानाला गती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘वज्रनिर्धार’ हे मोफत लसीकरण महाअभियान राबविण्यात येत आहे. या महाअभियानात पाच लाख मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने लसी मोफत दिल्या आहेत. पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ‘पीपीसीआर’ यांच्या वतीने सुरू असलेल्या या अभियानात आतापर्यंत एक लाख ३२ हजारांहून अधिक नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि दिव्यांगांना लस उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पीपीसीआर’, मुकुल माधव फाउंडेशन, ड्युरोशॉक्स इंडस्ट्रीज, पुणे जिल्हा रोटरी क्लब, हिंदुजा फाउंडेशन, बारक्लेज फाउंडेशन यासह इतर कंपन्यांनी आर्थिक पाठबळ देऊ केले आहे. शहरातील ७५ हून अधिक संस्था, संघटना आणि धार्मिक ट्रस्ट यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे, अशी माहिती पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. बहार कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी ‘वज्रनिर्धार’ महाअभियानाचा प्रारंभ झाला. महाअभियानातील स्वयंसेवकांच्या मदतीने अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांमधील नागरिकांशी संपर्क साधला जातो. लसीकरण न झालेल्या नागरिकांना कुपन दिले जाते. त्यात लसीकरण केंद्र, वेळ, तारीख याची माहिती असते. आजपर्यंत पुणे शहरात ८५ हजार २६६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फिरत्या लसीकरण केंद्राचीही सुविधा उपलब्ध करून दिली असून, महापालिका प्रशासनाकडून सहकार्य मिळत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

दिव्यांग, गर्भवतींसाठी विशेष प्रयत्न

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसह दिव्यांग, अंथरुणाला खिळून असलेल्या रूग्ण, गर्भवती, स्तनदा माता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही या महाअभियानात लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

"ज्या गरीब व्यक्तींना पैसे भरून कोरोना प्रतिबंधक लस घेणे शक्य नाही, त्यांना मोफत लस देण्याचा निर्णय आम्ही घेतला. समाजाप्रती बांधीलकी म्हणून आम्ही याकडे पाहतो. त्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर सहभागी सामाजिक संस्था नियोजनपूर्वक, विश्वासार्ह आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहेत, याचा मला सार्थ आनंद आहे."

- आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT