पुणे, ता. २३ : पुणे विमानतळाचा हिवाळी हंगाम (विंटर शेड्यूल) रविवारपासून (ता. २५) सुरू होत असून, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मिळवून दिलेले १५ वाढीव ‘स्लॉट’ विमान कंपन्यांच्या प्रतिसादाअभावी अद्याप रिकामेच आहेत. यंदा केवळ भुवनेश्वरसाठी एक नवीन उड्डाण वाढले असून, इतर कोणताही विस्तार न झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
पुण्याहून सध्या भुवनेश्वरसाठी एअर इंडिया एक्सप्रेसची सेवा सुरू आहे. हिवाळी हंगामात ‘इंडिगो’देखील भुवनेश्वरसाठी नवीन सेवा सुरू करणार आहे. ही सेवा दररोज असणार आहे. या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त वा नवीन सेवा यंदाच्या हिवाळी हंगामात जाहीर झालेली नाही. पुणे विमानतळावरील दररोज उपलब्ध असलेल्या २३५ पैकी २१६ स्लॉट (उड्डाणांच्या वेळा) विविध विमान कंपन्यांनी आरक्षित केले आहेत. पूर्वी पुणे विमानतळासाठी दैनंदिन २२० स्लॉट उपलब्ध होते. ते आता २३५ झाले आहेत. सद्यःस्थितीत पुणे विमानतळावरून देशातील ३५ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
‘‘पुणे आणि भुवनेश्वर या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान विमानसेवेमुळे हवाई कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. व्यापार, पर्यटन आणि शिक्षणासाठी प्रवास करणे यामुळे सोयीचे होणार आहे.’’
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.