Pune Crime  Sakal
पुणे

Pune: आळेफाटा पोलिसांमुळे मिळाले, चोरीला गेलेले चार तोळयाचे मंगळसुत्र

आपल्या पर्समधले दागिने चोरीला गेले आहेत याची माहिती त्यांणा तिकीटाचे पैसे देतेवेळी कळाली.

सकाळ डिजिटल टीम

राजेश कणसे

आळेफाटा- आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर)येथील दयावंती भागाजी सहाने या दि.७ एप्रिल रोजी आळेफाटा येथील बसस्थानकात ओतुर कडे जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये बसत असताणा चोरट्यांणी गर्दीचा फायदा घेत त्यांची पर्स मधुन चार तोळे वजनाचे मंगळसुत्र चोरून नेले होते.

आपल्या पर्समधले दागिने चोरीला गेले आहेत याची माहिती त्यांणा तिकीटाचे पैसे देतेवेळी कळाली. त्यानंतर‌ त्यांणी आपले दागिने चोरीला गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिली होती.

दरम्यान झालेली चोरीच्या तपास पोलिसांणी एक पथक तयार करून तपास सुरु केला असता संदीप अच्युतराव वाघराळ रा.महावीर चौक ता. अंबड जि.जालना यास व दोन महिलांणा संशयीत म्हणुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता आरोपीने चोरी केल्याचे कबुली दिल्यानंतर त्यांच्या कडुन चोरी केलेले दागीने जप्त केले आहेत.

पोलीसांणी आरोपीस अटक केली आहे.सदर कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश‌ घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर , नरेंद्र गायकवाड,विनोद गायकवाड,अमित माळुंजे,नवीन अरगडे, प्रशांत तांगडकर,दिपाली फटांगरे,पंकज पारखे यांणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT