Pune Car Crash news esakal
पुणे

Pune Car Crash: फील्ड ऑपरेशन, टेक्निकल ॲनालिसिस...पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या 12 टीम, 100 पोलीस, तपासात काय समोर आलं?

Pune Car Crash : कल्याणीनगर भागात १९ मे रोजी एका कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिल्याची घटना घडली होती. ही कार अल्पवयीन चालवत असल्याचा आरोप आहे.

Sandip Kapde

Pune Car Crash: पुण्यातील अपघाताने देशात खळबळ माजली आहे. संपूर्ण अग्रवाल कुटुंब आता अटकेत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोर्शे कारने दोघांना धडक दिली होती. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांवर देखील दबाव वाढला. आता या प्रकरणात पोलीस ॲक्शनमोडवर आले आहेत. विध पैलूंचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १०० कर्मचाऱ्यांचे १२ पथके तयार केली आहेत.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी एका कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिल्याची घटना घडली होती. ही कार अल्पवयीन चालवत असल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या तीन प्रकरणांमध्ये किशोरवयीन मुलाला दारू देणाऱ्या बारविरुद्धच्या खटल्याचा समावेश आहे. (Pune Accident News in Marathi)

वैध परवान्याशिवाय कार चालवण्यास दिल्याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या बिल्डर वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या प्रकरणात कुटुंबाने चालकाला चुकीच्या पद्धतीने कैद केले आणि अपघातासाठी जबाबदार धरण्यास भाग पाडले. आता ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवालला देखील अटक करण्यात आली.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे म्हणाले, तपास प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सुमारे 100 पोलीस कर्मचारी या प्रकरणाच्या विविध पैलूंचा शोध घेत आहेत. पोलिसांनी नोंदवलेल्या तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रत्येकी 8 ते 10 कर्मचाऱ्यांची तीन टीम, केस डॉक्युमेंटेशनसाठी दोन टीम, सीसीटीव्ही फुटेजवर नजर ठेवण्यासाठी एक टीम, टेक्निकल ॲनालिसिससाठी तीन टीम आणि फील्ड ऑपरेशनसाठी अनेक टीम तयार केल्या आहेत. प्रत्येकी एका टीमला आरोपींना एस्कॉर्ट करण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम देण्यात आले आहे.

पुण्याचे पोलिस प्रमुख अमितेश कुमार यांनी शनिवारी सांगितले, अल्पवयीनच्या कुटुंबातील सदस्यांपैकी पोलिसांनी आतापर्यंत त्याचे वडील, आजोबा आणि त्याच्या आईला अटक केली आहे. प्रत्यक्षात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची पुष्टी झाली. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी सरकारी ससून सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता, बाल न्याय कायदा, मोटार वाहन कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT