Protest  esakal
पुणे

Pune : चिपको आंदोलनात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजी उद्यान ते डेक्कन जिमखाना पीएमपी बस थांबा, तेथून नदी काठच्या रस्त्याने गरवारे पुलापर्यंत फेरी काढली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नदीकाठ सुधार योजनेत नदी काठावरील हजारो झाडे तोडली जाणार असल्याने याविरोधात पुण्यातील अनेक पर्यावरण प्रेमी संस्था, संघटना व नागरिकांतर्फे उद्या (ता. २९) चिपको आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले.

छत्रपती संभाजी उद्यान ते डेक्कन जिमखाना पीएमपी बस थांबा, तेथून नदी काठच्या रस्त्याने गरवारे पुलापर्यंत फेरी काढली जाणार आहे. तेथे असलेल्या झाडांना आलिंगन देऊन झाडे तोडू नका असे आवाहन महापालिका प्रशासनाला केले जाणार आहे.

असे प्रियदर्शिनी कर्वे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले यावेळी. पुणे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रॅण्ड ॲबेसेटर सत्या नटराजन, अमित सिंग, संजय ललवानी, कल्याण माने यावेळी उपस्थित होते.

नदीकाठ सुधार योजनेत अनेक झाडे तोडली जाणार आहेत. वृक्ष तोडण्याचा प्रस्तावावरील वृक्षांची संख्या आणि प्रत्यक्षात तोड केल्या जाणाऱ्या झाडांची संख्या यात तफावत आहे. नदीकाठची परिसंस्था यामुळे धोक्यात येणार आहे. प्रशासनाने बाजू समजून घेणे आवश्‍यक आहे. पण त्याऐवजी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची घाई लागली आहे. त्याविरोधात उद्याचे आंदोलन होत आहे, असे नटराजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणात मोठी कारवाई

Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य, विश्वास नांगरे पाटील यांचे थेट आदेश

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

SCROLL FOR NEXT