पुण्यात पावसाची जोरदार हजेरी sakal
पुणे

IMD : पुण्यात दुपारनंतर पावसाची शक्यता

सोमवार (ता.४) पासून शहर व परिसरात सकाळी निरभ्र आकाश, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोमवार (ता.४) पासून शहर व परिसरात सकाळी निरभ्र आकाश, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार (ता.९) पर्यंत तरी पुणे शहर व परिसरात आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, जिल्ह्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता.६) शहरात दुपारनंतर बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. दुपारपर्यंत निरभ्र असलेल्या आकाशात अचानकच ढगांची गर्दी होत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अर्धा-एक तास चाललेल्या या पावसानंतर रस्त्यावर काही अंशी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.

बुधवारचा पाऊस (संध्याकाळी सात पर्यंत) :

ठिकाण : पाऊस (मिलिमीटर)

  • पुणे शहर : १५

  • लोहगाव : ६

  • पाषाण : १५.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT