SHAHAJI_K_JADHAV
पुणे

पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू; उल्लंघन केल्यास कारवाई

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून (ता. 10) जमावबंदीचा आदेश लागू असेल, तर 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात येईल. दरम्यान, याबाबतचे आदेश नुकतेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून पोलीस आयुक्तालय हद्दीत उत्सव कालावधीत कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक ठिकाणी, मंडळासमोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, गॅस, पेट्रोल) पदार्थाच्या साह्याने आगीचे लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहे. याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT