Mcoca crime Sakal
पुणे

Mcoca Crime : पुणे शहरातील राहुल शेंडगे टोळीतील ११ जणांवर मोकांतर्गत कारवाई

टिंबर मार्केटमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या राहुल शेंडगे टोळीतील अकराजणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - टिंबर मार्केटमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या राहुल शेंडगे टोळीतील अकराजणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई केली. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

राहुल दत्तू शेंडगे (वय २१), करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (वय २१), लखन भानुदास आगलावे (वय २२), शंकर अण्णा कोंगाडी (वय २५) आणि रोहन दत्तू शेंडगे (वय २४, सर्व रा. लोहियानगर), महेश इंद्रजित आगलावे (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड), विशाल ऊर्फ लल्ल्या ऊर्फ लक्ष्मण भारत पारधे (वय २१, रा. पीएमसी कॉलनी, गंजपेठ) यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलासह तिघेजण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमध्ये टोळी प्रमुख राहुल शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी ‘माझ्या भावाला का मारले,’ असे विचारत एका तरुणावर कोयत्याने वार करून मित्रांना मारहाण केली. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या टोळीवर मोकांतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी मोकाचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यामार्फत पाठविला. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी मोकाच्या कारवाईस मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

SCROLL FOR NEXT