home sale sakal
पुणे

Sale of Houses : पुणे शहराच्या पश्चिम भागात सर्वाधिक घरांची विक्री; महागड्या घरांचा ‘ट्रेंड’ कायम

पुणे शहराच्या सर्वच भागात नवीन सदनिकांना असलेली मागणी यंदाही कायम आहे. यंदाच्या सहामाहीत शहराच्या पश्चिम भागात २०१९च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री वाढली आहे.

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे - शहराच्या सर्वच भागात नवीन सदनिकांना असलेली मागणी यंदाही कायम आहे. यंदाच्या सहामाहीत शहराच्या पश्चिम भागात २०१९च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री वाढली आहे. येथील घरांची सरासरी किंमत ७३ लाख रुपये आहे, तर शहराच्या मध्य भागात सर्वांत महागडी घरे असल्याचा ‘ट्रेंड’ यंदाही कायम आहे.

पश्चिम भागात म्हणजेच हिंजवडी, वाकड, म्हाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस आणि बालेवाडी परिसरात जानेवारी ते जून २०२३ दरम्यान १० हजार ७५० घरांची विक्री झाली आहे. या भागात २०१९ मध्ये वर्षभरात १४ हजार १९४ घरांची विक्री झाली.

पिंपरी-चिंचवड सर्वांत स्वस्त

२०१९ पासून घरांच्या सरासरी किमतीचा विचार केला असता, पिंपरी-चिंचवड शहर घर खरेदीसाठी स्वस्त ठरत आहे. येथील घरांचे दर २०१९ पासून २०२३ पर्यंत सर्वांत कमी आहेत. यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ४८ लाख रुपये आहेत. यंदाच्या सहामाहीत तेथे १७ हजार ५० घरांची विक्री झाली आहे. त्यांचे एकूण मूल्य हे आठ हजार २०५ कोटी रुपये आहे.

शहराच्या पश्चिम भागात आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. तेथे लँड बँकदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे तिकडे घरांची निर्मिती आणि मागणी दोन्ही जास्त आहेत, तसेच चांगली कनेक्टिव्हिटी असून मुंबईला जाणे सोईचे ठरते, या बाबीही कारणीभूत आहे.

- शंतनू बुट्टेपाटील, कार्यकारी संचालक, बुट्टेपाटील प्रॉपर्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT