किल्ल्यांचे दरवाजे उघडले 
पुणे

Pune : किल्ल्यांचे दरवाजे उघडले

शिवनेरीला पहिल्याच दिवशी पाचशे पर्यटकांची भेट

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील भारतीय पुरातत्त्व विभागाची स्मारके खुली करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला शुक्रवारपासून (ता. १७) शिवभक्तांसाठी खुला केला आहे.

वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी यास दुजोरा दिला आहे. पहिल्याच दिवशी सुमारे पाचशे पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली असल्याचे वनपाल नितीन विधाटे यांनी सांगितले. शिवनेरी खुला झाल्याने आता शिवभक्त व पर्यटकांना पवित्र शिवजन्मभूमीचे दर्शन घेता येणार आहे.

जिल्ह्यातील स्मारके खुली करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व खात्यावर आहे. या ठिकाणी शारीरिक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझर वापर बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

शिवाई मंदिर बंद राहणार

शिवनेरी पर्यटक व शिवभक्तांसाठी खुला झाला असला, तरी गडावरील शिवाई मातेचे मंदिर मात्र बंद राहणार असल्याचे पुजारी सोपान दुराफे यांनी सांगितले. मंदिरे खुली करण्याचा आदेश नसल्याने गडावरील शिवाईमातेचे दर्शन घेता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

SCROLL FOR NEXT