Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : धक्कादायक! लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुलाची सख्ख्या आईला अमानुष मारहाण

शिवीगाळ करत मुलाने आईला लाकडाच्या ओंडक्याने मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या मुलांसाठी आई असंख्य गोष्टीत त्याग करते, त्यांच्या आडीनिवडी जपण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. पण मोठं झाल्यावर याच मुलांना आई नकोशी होते. अशाच एका मुलाने आपल्या आईला अमानुषपणे मारहाण केली आहे. याप्रकरणी आईने मुलाविरोधात तक्रार दिली आहे.

वैजयंता जाधव असं या आईचं नाव असून त्या इंदापूर तालुक्यातल्या पळसदेव इथं राहतात. त्यांनी आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २४ तारखेला वैजयंता यांच्या मोठ्या मुलाने त्यांना मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी केली. या मुलाने त्यांना लाकडाचा ओंडकाही फेकून मारला.

या मारामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर दोघांनी काल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा दिलीप याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मारहाण करण्याचं कारण अद्याप कळलं नाही. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drunk Driving Law : केवळ तोंडातून दारुचा वास आला म्हणजे ड्रायव्हर नशेत आहे, असं मानता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Latur News: लातूर हादरले! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड कारमध्ये मृतावस्थेत; औषधांच्या बाटल्या, सिरिंज अन्..नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : कणबर्गीतील १६० एकर भूसंपादनावर आक्षेप; जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार, जिल्हाधिकारी घेणार बैठक

IND vs ENG, 2nd ODI: गिलची तंदुरुस्ती अन् रोहितच्या फॉर्मवर लक्ष; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज रंगणार

Lanja Road Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! गोव्याहून फिरून येताना मुंबईच्या नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला; कार डंपरवर आदळून चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT