crime sakal
पुणे

पुणे : वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवल्यानं मुलाने केली वडिलांची हत्या

धार नसल्यानं सुरीने खून करता येईना, म्हणून शेवटी वरवंटा डोक्यात घालून मुलाने वडिलांची हत्या करताना क्रौर्याचा कळस गाठला.

राजेंद्र सांडभोर

धार नसल्यानं सुरीने खून करता येईना, म्हणून शेवटी वरवंटा डोक्यात घालून मुलाने वडिलांची हत्या करताना क्रौर्याचा कळस गाठला.

राजगुरूनगर : वडिलांनी वृद्धापकाळात स्वतःच्या लग्नासाठी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदविल्याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांचा खून(murder case) केल्याची घटना येथे काल ( ६ जानेवारी ) संध्याकाळी घडली. शंकर रामभाऊ बो-हाडे, ( वय- ८० वर्षे. रा. - नंदादीप हौसिंग सोसायटी, बी विंग, फलॅट नंबर ९, वैशंपायन आळी, राजगुरूनगर, ता. खेड ) असे मृताचे नाव आहे. तर शेखर ( वय ४७ ) असे खून करणाऱ्या संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बोऱ्हाडे याचा पंचायत समिती चौकात दूध आणि पॅकेजिंग खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय आहे.

त्याचे वडील शंकर बोऱ्हाडे यांनी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदविले आणि ते त्याच्यापासून लपवून ठेवले, हे समजल्यावर शेखर याचा राग अनावर झाला. त्याने राहत्या सदनिकेत, स्वयंपाक घरातील सुरीने त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. पण सुरीने गळा चिरला गेला नाही, म्हणून सुरीला वारंवार धार लावून गळा चिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वरवंट्याने तोंडावर आणि डोक्यात घाव घालून त्यांचा खून केला. त्याने स्वतःच या गुन्ह्याची कबुली देऊन फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक सतीश गुरव अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT