crime news sakal media
पुणे

करणी झाल्याचे सांगून एकाने लुटले 50 लाख; तर दुसऱ्याकडून महिलेचा विनयभंग

खडक पोलिस ठाण्यात जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिलेवर करणी झाल्याचे सांगून भोंदू बाबाने अघोरी कृत्य करीत महिलेकडून तब्बल 50 लाख 30 हजार रुपये उकळले. तर त्याच्याकडून पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदू बाबासह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. (Pune Crime News)

राजेंद्र बलराम कन्ना (वय 45, रा. महात्मा फुले पेठ), मनिष बापूराव शिंदे (वय 42, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विनयभंग, फसवणूक, संगनमत करुन धमकावणे आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2018 ते 2019 या कालावधीमध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई आजारी होत्या. त्यांच्यावर त्या उपचार करीत होत्या. त्यावेळी त्या राजेंद्र कन्ना या महाराजाच्या संपर्कात आल्या. त्यावेळी त्याने फिर्यादीस तुमच्या आईवर नातेवाईकाने करणी केल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी त्याने कागदी चिठ्ठ्या तयार केल्या. काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु यांचा वापर करुन होमहवनही करीत जादुटोण्यासारखे अघोरी कृत्य करून फिर्यादीचा विश्वास प्राप्त केला.

त्यानंतर फिर्यादीस वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 50 लाख 30 हजार रुपयांची रक्कम घेतली. दरम्यान, शिंदे याने फिर्यादीस कन्ना याच्याकडून रक्कम मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीसोबत अश्‍लिल चाळे करीत त्यांचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून कन्ना व शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra farmer loan waiver : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा, काय आहेत नियम ? अहिल्यादेवी होळकरांचे दिले नाव

वाढवण बनेल ‘चौथी मुंबई’, १,२०० किमी मेट्रो, ६,००० किमीचा एक्सप्रेसवे अन्...; अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठा मास्टरप्लॅन, तरतुदी काय?

Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांचे स्वप्न भंगले! वाढीव निधीच नाहीच, महायुती सरकारचा यू-टर्न; अर्थसंकल्पात मोठी निराशा

IND vs NZ Final Rule : ... तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद दिले जाणार! T20 World Cup फायनलसाठी ICC चा नियम घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT