pune crime police arrest accused in rape case abuse crime women husband wife debt money sakal
पुणे

Pune Crime : पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

उधार पैसे परत न दिल्यामुळे एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उधार पैसे परत न दिल्यामुळे एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मागील फेब्रुवारी महिन्यात घडला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची हडपसर परिसरात धिंड काढली.

इम्तियाज हशीम शेख (वय ४७, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्तियाज शेख याने पीडित महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उधार दिले होते.

पैसे परत न केल्यामुळे इम्तियाजने मागील फेब्रुवारी महिन्यात पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने दोघांना सुरक्षानगर परिसरात बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्यासमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांनंतर आरोपीने पीडित महिलेकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली.

परंतु पीडित महिलेने त्याला नकार दिला. त्यावर या घटनेचे चित्रीकरण पतीला पाठवून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची हडपसर परिसरात धिंड काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT