Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : 'झूमकार' ॲपवरुन कार भाड्याने घेतली पण परत दिलीच नाही; शोध लागला थेट गुजरातमध्ये...

मुदत संपल्यानंतर कार मालकाने कार परत करण्याची विनंती केली मात्र आरोपीने फोनला उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू केली.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - 'झूमकार' ॲपवरुन आपली कार भाड्याने देणे एका कार मालकाला चांगलेच महागात पडले आहे. काही दिवसांसाठी कार घेऊन गेलेला व्यक्ती कार परत देत नसल्याने अखेर कार मालकाने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी थेट गुजरातमधून कार परत आणली आहे मात्र अविनाश रंगराव मामलेकर (वय 39, रा. प्लॉट नं.31, गणेश कॉलनी, डोंबिवली वेस्ट, मुंबई) हा आरोपी फरार झाला आहे.

आरोपी अविनाश मामलेकर याने झूमकार या ॲपच्या माध्यमातून कार मालकांशी संपर्क केला व त्यांचा विश्वास संपादन करुन अगोदर चार दिवसांसाठी व नंतर तीन दिवसांसाठी कार भाड्याने घेतली. ॲपच्या नियमानुसार आरोपी अविनाश मामलेकर याने त्याचे आधारकार्ड व वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत कार मालकांकडे जमा केली होती.

मुदत संपल्यानंतर कार मालकाने कार परत करण्याची विनंती केली मात्र आरोपीने फोनला उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू केली. अनेक वेळा प्रयत्न करुनही आरोपी कार परत न देता वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असल्याचे कारमध्ये बसविलेल्या जीपीएस यंत्रणेवरुन कार मालकांना दिसत होते.

अखेर आरोपी अविनाश मामलेकर याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कार मालकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार केली.

प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे व पोलीस हवालदार विलास प्रधान यांनी तांत्रिक माहिती पडताळल्यानंतर कार गुजरात राज्यातील वापी परिसरात असल्याचे आढळून आले.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे व पोलीस हवालदार विलास प्रधान यांनी गुजरात येथे जाऊन आरोपीने बेवारस स्थितीत सोडून दिलेली कार परत आणली आहे.

फरार आरोपी अविनाश मामलेकर याचा शोध सुरू असून कायद्यातील तरतुदीनुसार ही कार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर मूळ मालकांना परत देण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT