pune crime Sale of rented four wheelers near Pakistan border accused arrested three vehicles worth 60 lakh seized Sakal
पुणे

Pune Crime : भाड्याच्या चारचाकींची थेट पाकिस्तान सीमेजवळ विक्री, आरोपी अटकेत

संशयित आरोपी अटकेत, साठ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : प्रवासाकरिता भाड्याने चार चाकी घेत त्यांची थेट पाकिस्तान सीमेजवळ विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी एका संशयित आरोपीला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल साठ लाखांच्या तीन चारचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सुफियान चौहान (वय.१९, रा. फतेगंज,गुजरात) असे मध्यप्रदेश येथे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार "झुमकार कंपनी मोबाईल एप्लीकेशन वरून चार चाकी भाड्याने देते. आरोपी चौहान याने विविध व्यक्तींचे ओळखपत्रे अपलोड करीत गाड्या भाड्याने घेत त्यांची परराज्यात विक्री करतो.

त्यानुसार खराडी येथील प्राची पठारे यांची वीस लाख रुपये किमतीची चार चाकी (एम एच बारा टी के २८४७ ) झूमकार वरून भाड्याने घेऊन आरोपी पळून गेल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. आरोपीने हीच पद्धत वापरून वाघोली, विश्रांतवाडी येथूनही महागड्या चार चाकी भाड्याने घेत पुढे त्या पाकिस्तान सेमी जवळ राजस्थान येथे अवैध धंद्यासाठी विकल्या.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी इंदोरला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार उपनिरीक्षक अरविंद कुमरे, कर्मचारी श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विकास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे ,सुहास निगडे, अविनाश संकपाळ यांनी इंदोरला जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT